एका रात्रीत २२४ गरजूंच्या अंगावर प्रत्यक्ष पांघरून घालून युवकांनी केली सेवा.
सोलापूर प्रतिनिधी वैभव यादव
माणुसकी फाऊंडेशन सोलापूर च्या वतीने रात्री ११ ते पहाटे ३.३० वाजेर्यंत सलग चौथ्या वर्षी राबविण्यात आला उपक्रम.नको असलेले द्या हवे असलेले घेऊन जावा या धर्तीवर कार्य करणाऱ्या माणुसकी फाऊंडेशन सोलापूर च्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात असतात. दर वर्षी प्रमाणे यंदाही थंडीच्या दिवसात रस्त्यावर झोपणाऱ्या गरजूंना थंडीपासून संरक्षण मिळावे या हेतूने रात्री ११ ते पहाटे ३.३० वाजेपर्यंत शहरातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील एकूण २२४ गरजूंच्या अंगावर ब्लँकेट, चादर, स्वेटर, टोपी, मोफलर व वाकळ आदी प्रत्यक्ष पांघरून घालून सेवा करण्यात आल्याची माहिती हिंदुराव गोरे यांनी दिली. उपक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तर समारोप डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे करण्यात आला या वेळी मेकॅनिक चौक, रेल्वे स्टेशन, सात रस्ता, विजापूर रोड, सैफुल, जुळे सोलापूर, आसरा चौक, विकास नगर, गुरुनानक चौक, सत्तर फूट रोड, एमआयडीसी , अक्कलकोट रोड, सोना चांदी अपार्टमेंट विडी घरकुल, हैदराबाद रोड, बाजार समिती, तुळजापूर नाका, पुणे नाका, एसटी स्टँड, नवी पेठ, पार्क चौक, सिध्देश्वर मंदीर परिसर, डफरीन चौक व रामलाल चौक आदी भागातील रस्त्यांवर झोपणाऱ्या गरजूंच्या अंगावर प्रत्यक्ष पांघरून घालण्यात आले. या उपक्रमासाठी नंदकिशोर बलदवा, डॉ अस्मिता कोलूर, स्वप्नील आळंद, निर्मलकुमार काकडे, नागेश पिसे, शांतवीर स्वामी, बलराज बायस, प्रियांका व्हणशेट्टी, अर्चना आघाव, वासंती उंब्रजकर, महेंद्र ढवण, प्रज्वल निवर्गी आदींनी आपले योगदान दिले.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अनिकेत चनशेट्टी, सायन्ना कोळी, सूरज रघोजी, योगेश कबाडे, डोंगरेश चाबुकस्वार, सागर बुरबुरे, अमोल गुंड, विघ्नेश माने, प्रेम भोगडे, अजय आयगोळे, हनमंतू कोळी, वृषभ गुमटे, अनिकेत गोरे, श्रीराज बूरा, अनिरुद्ध कदम, प्रज्वल नीवर्गी, किशोर कलबुर्गी, समर्थ उबाळे, विश्वेत नाडीमेटला, मल्लिनाथ शेट्टी, पंकज चिंचोळी, सतीश थळंगे, अक्ककोटचे रशीद खिस्तके, सरफराज कमनघर, प्रतीक भडकुंबे, जगदीश वासम, अमित जनगौड, रोहित राक्षे आदींनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog