इंदापूर चा बेस बॉल संघ दिल्लीला ठरला झाला उपविजेता
इंदापूर तालुका प्रतिनिधी.. धनश्री गवळी इंदापूर.
*इंदापूर*(दि.१२) -: येथील डॉ. कदम स्पोर्ट ॲकॅडमीतील ११ वर्ष वयोगटातील खेळाडूंनी दिल्ली येथे दि.१० ते १२ डिसेंबर २०२१ मध्ये पार पडलेल्या MLB Cup India 2021 बेसबॉल स्पर्धेमध्ये सलग तीन मॅच जिंकून अंतिम फेरी गाठली. त्यामध्ये पहिली मॅच पौडेचेरी बरोबर १७ गुणांनी जिंकली. दुसरी मॅच मणिपुरम बरोबर १७ गुणांनी जिंकली.तिसरी मॅच अहमदनगर बरोबर १७ गुणांनी जिंकली. आणि संघाने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. आज अंतिम सामना  पुणे एंजल्स V/S सातारा ब्लुजय यांच्यामध्ये रंगतदार झाला. यामध्ये पुणे एंजल्स अर्थात डॉ.कदम स्पोर्ट ॲकॅडमीने उपविजेते पद पटकावले. सिल्वर मेडलने संघाला गौरविण्यात आले.पुणे एंजल्स म्हणजे डॉ.कदम स्पोर्ट ॲकॅडमी इंदापूरचे खेळाडू ओम बालाजी अडसूळ,अक्षय दादासाहेब खाडे, चेतन धनंजय बनकर, वेदांतराजे चंद्रदीप साळुंखे, शिवराज पांडुरंग शेरकर,आरुष सोमनाथ माने, वेदांत लक्ष्मण सपकाळ, वेदांत ज्ञानेश्वर देवकर,तनया सचिन पवार,आस्मी नितीन राऊत, प्रगती संदीप जगताप,स्वरा तुषार गूजर, या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली.तसेच ओम बालाजी अडसूळ हा गुरुकुल गोखळी चा विद्यार्थी डॉ. कदम स्पोर्ट ॲकॅडमी मधून याची निवड झाली होती या खेळाडू ला MLB cup India 2021 चा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून पुरस्कार मिळाला.. संघाचे प्रशिक्षक म्हणून विष्णू काळेल, वैभव जगताप यांचा MLB Cup India 2021 ने मेडल देऊन गौरव केला.तसेच पालक प्रतिनिधी म्हणून ज्ञानेश्वर बाळासो देवकर,सुनिता ज्ञानेश्वर  देवकर,स्कूल मॅनेजर म्हणून संदीप भानुदास जगताप यांचाही गौरव केला.डॉ.कदम स्पोर्ट ॲकॅडमी इंदापूर मधील सर्व खेळाडू, प्रशिक्षक,पालक यांचे डॉ.कदम स्पोर्ट ॲकॅडमी चे अध्यक्ष डॉ.एल. एस कदम व संस्थेच्या संचालिका डॉ. सविता कदम, प्राचार्य वृंदा मुलतानी-जोशी, कनिष्ठ विभाग प्राचार्या अनिता पराडकर, उपप्राचार्य रिशी बसू यांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog