कर्मयोगी कारखान्यावरील शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरविणार - ...हर्षवर्धन पाटील
प्रतिनिधी... धनश्री गवळी इंदापूर.
      5 बैठकांना शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- चालु हंगामातील रु.14 कोटीची बिले अदा
- कारखान्याचे 2.5 लाख टन गाळप पूर्ण
इंदापूर : प्रतिनिधी दि.12/12/21
       कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याने चालू हंगामात आज अखेर 2.5 लाख मे. टन ऊसाचे गाळप पूर्ण केले आहे. सध्या प्रतिदिनी स8500  मे. टन क्षमतेने ऊसाचे गाळप केले जात असून आजपर्यंत चालू हंगामातील रु.14 कोटीची ऊस बिले शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहेत. तसेच कारखान्यामध्ये चालू हंगामात पहिल्यांदाच इथेनॉलचे उत्पादन घेतले जात असून 81 लाख लिटर इथेनॉल पुरवठ्याचे टेंडर कारखान्याला मिळाले आहे. कारखान्याचा चालू गळीत हंगाम उत्कृष्टपणे सुरु असून, कर्मयोगी कारखान्यावरील शेतकऱ्यांचा असलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी संचालक मंडळ कटिबद्ध असल्याची स्पष्ट ग्वाही कारखान्याचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी (दि.12) दिली.
     महात्मा फुलेनगर (बिजवडी ता. इंदापूर ) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आज  दिवसभर 1) सरडेवाडी  2) शिरसोडी  3) कालठण नं. 1,  4) भिगवण   5) पळसदेव  हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी भव्य संवाद बैठका संपन्न झाल्या. या बैठकांना शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
    हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, कारखान्यावरती प्रेम करा, कारण सहकारी संस्था महत्वाच्या आहेत. कर्मयोगी शंकररावजी पाटील उर्फ भाऊंनी स्थापन केलेल्या कारखान्याने 31 वर्षांमध्ये शेतकरी, कर्मचारी व  हजारो कुटुंबांना आर्थिक आधार दिला आहे. कर्मयोगी कारखाना सहकाराचे मंदिर आहे. कारखान्याने सर्व उपपदार्थ निर्मितीचे प्रकल्प उभारले आहेत.  त्यामुळे कारखान्यास आगामी काळात गतवैभव प्राप्त करण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी साथ द्यावी, असे आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी केले.
         कारखान्याकडून मस्टरनिहाय ऊस बिले वेळेवर दिली जात आहे, वेळेवर ऊस बिले मिळण्याचे काटेकोर नियोजन केलेले आहे. गाळप क्षमता विस्तारीकरण व दोन दुष्काळामुळे कारखाना काहीसा अडचणीत आला, मात्र योग्य नियोजनामुळे आता अडचणीचा काळ दूर होत चालला आहे. कारखान्याची मालमत्ता तब्बल 650 कोटी झाली आहे. लवकरच कारखाना प्रतिदिनी 9000 मे. टन ऊस गाळपाचा पल्ला पार करेल, तसे नियोजन करण्यात आले आहे. आपल्या सर्वांचाच कारखाना असल्यामुळे चालू हंगामात 12 लाख मे. टन ऊस गाळप पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, अशी आवाहन या संवाद बैठकांमधून हर्षवर्धन पाटील यांनी केले.
         कर्मयोगी कारखान्यास माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे सक्षम नेतृत्व लाभले आहे, त्यामुळे आगामी काळ कारखान्यासाठी गतवैभव प्राप्त करणारा राहील, असे भाषणामध्ये कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांनी सांगितले.
     यावेळी कारखान्याचे संचालक हनुमंत जाधव, शांतीलाल शिंदे, रवींद्र सरडे, छगन भोंगळे, बाळासाहेब पाटील, राहुल जाधव, अंबादास शिंगाडे, पराग जाधव, विश्वास देवकाते, निवृत्ती गायकवाड, भूषण काळे, प्रवीण देवकर, रतन देवकर, केशव दुर्गे, सतीश व्यवहारे, हिरा पारेकर, वसंत मोहोळकर, शारदा पवार, कांचन कदम, कार्यकारी संचालक देवराव लोकरे, शेतकी अधिकारी   व गावोगावचे पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हर्षवर्धन पाटील यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला व अडीअडचणी जाणून घेतल्या. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केल जात आहे .   
.

Comments

Popular posts from this blog