एक जानेवारीला पडणार ओबीसी आंदोलनाची ठिणगी...
   इंदापूर तालुका प्रतिनिधी... धनश्री गवळी 
  इंदापूर येथेओबीसी आंदोलन एक जानेवारी रोजी होणार आहे म्हणून याच दिवशी रस्ता रोको तसेच इंदापूर बंद राहणार आहे असे भाजप नेते पांडुरंग शिंदे यांनी सांगितले. ओबीसी.चा राज्य मागास आयोग स्थापन करण्याची गरज होती. या आयोगाला 500 कोटी रुपये निधी देण्याची गरज होती. राज्यामध्ये 72% ओबीसी मतदान असताना आमच्या हक्काचे आरक्षण या सरकारने पळवून नेले. म्हणूनच एक जानेवारी दोन हजार बावीस या नवीन वर्षामध्ये इंदापूर मध्ये या आंदोलनाची ठिणगी पडणार आहे आणि ही ठिणगी राज्यभर पेट घेणार आहे. असे वक्तव्य भारतीय जनता पार्टी चे ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी केले. पांडुरंग शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक 22 रोजी ओबीसी संघर्ष समिती बैठक शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आली होती. एक जानेवारी रोजी सावता माळी मंदिरांमधून ओबीसी चा भव्य मोर्चा मुख्य बाजारपेठे  मधून निघणार आहे. याच दिवशी इंदापूर शहर पूर्णपणे बंद राहणार आहे तसेच रस्ता रोको आंदोलन होणार आहे. या आंदोलनासाठी इंदापूर तालुक्यातील संपूर्ण ओबीसी समाज एकत्र येणार आहे. यावेळी नाभिक समाजाचे पुणे जिल्हा अध्यक्ष श्री रमेश राऊत यांनी असे सांगितले की ओबीसी समाज एकत्र आला तरच आपणास न्याय मिळणार आहे. आपण जर गप्प बसलो तर येणारा काळ आपल्याला कधीही माफ करणार नाही आता ओ बि सी ची लढाई थांबणार नाही. आपणा मध्ये असलेले गट तट व राजकारण बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज आहे असे राऊत यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी कर्मयोगी चे माजी संचालक अतुल व्यवहारे, युवराज मस्के, भाजप प्रदेश चिटणीस जिल्हा परिषद समिती आघाडी संतोष कांबळे, सचिव भाजप अनुसूचित जाति मोर्चा शब्बीर बेपारी, पुणे जिल्हा नाभिक महामंडळाचे अध्यक्ष रमेश राऊत, दत्तात्रय सपकाळ, आबासाहेब थोरात, जिल्हा कार्याध्यक्ष ओबीसी मोर्चा बामसेफचे सदस्य संजय शिंदे, पोपट पवार इत्यादी यावेळी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog