संगमेश्वर मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आरोग्य जागर शिबिर
राष्ट्रीय सेवा योजना विभाग संगमेश्वर कॉलेज (स्वयत्ता) सोलापूर यांच्या वतीने कॉलेजमधील विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आली होती. यामध्ये रक्तदाब, मधुमेह आणि अन्य वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. कॉलेज मध्ये एकूण 100 हून अधिक विद्यार्थी शिक्षकांनी याचा लाभ घेतला. या प्रसंगी उद्घाटन सत्रात बोलताना प्राचार्य डॉक्टर अशा आरोग्य शिबिरातून विद्यार्थी, शिक्षकांनी तपासणी करून घेऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रमाणे आपल्या जीवन शैलीत बदल करावा आणि निरामय, संपन्न जीवन जगावे.
या प्रारंभी आलेल्या वैद्यकीय पथकाचे स्वागत राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने करण्यात आले. वेलनेस फॉरेव्हर पथकातील दीपक गेंड , सुप्रिया करपे, प्रशांत माळी, आकाश वाघमोडे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक अण्णासाहेब साखरे यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली अनिकेत फताटे, बाळासाहेब कांबळे, अनन्या कोळी, उषा बामणे, महांतेश देसाई, अर्पिता बंगारे या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंवकांसह कॉलेजमधील विद्यार्थींनी आणि कर्मचाऱ्यांनी शिबीर यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment