इंदापूर तालुका प्रतिनिधी.. धनश्री गवळी,माय मराठी न्यूज चॅनल.
आज इंदापूर येथील सन 1984/ 85 या वर्षातील इयत्ता दहावी मध्ये शिकून आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात केलेली व उद्योग व्यवसायामध्ये नोकरीमध्ये प्रगती करणारे या बॅचचे विद्यार्थी विद्यार्थिनी श्री नारायणदास रामदास
हायस्कूल इंदापूर येथील विद्यार्थ्यांनी व शाळेने 36 वर्षांनी विद्यार्थी-शिक्षक स्नेहमेळावा कार्यक्रमाचे आयोजन केले होते . या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व गुरुजन शिक्षक वर्ग त्याच बरोबर सर्व वर्गमित्र मैत्रिणींनी कार्य कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली होती. छत्तीस वर्षाने पुन्हा एकदा नारायणदास रामदास हायस्कूल मध्ये आपला वर्ग भरला, व जुन्या आठवणींना उजाळा मिळाला . यावेळी उपस्थित सर्वांना 36 वर्षापूर्वीचे दिवस आठवू लागले .आणि त्याचा एक वेगळाच आनंद आपण सर्वांनी त्या ठिकाणी घेतला . यावेळी उपस्थित प्रत्येकाने आपले विचार शाळेबद्दल ची आत्मीयता व मी कसा मोठा झालो याबद्दल प्रत्येकाने आपले विचार मांडले. उपस्थित सर्वांनी शाळेला भेट देऊन गुरुजनांचे आशीर्वाद घेतले अतिशय आनंदी वातावरणामध्ये गेट-टुगेदर छान साजरा केला या कार्यक्रमासाठी विरेन गलांडे विकास फलफले संदेश गोसावी किरण अवचर सुशील काळे संजय पाटील सौ सविता गुंडेकर तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष गोरक्षनाथ ठोंबरे घाडगे सर उपस्थित होते तसेच गुजर सर सुर्वे सर देवकर सर सर बोराटे सर चव्हाण सर भामरे सर दंडवते सर ठोंबरे मॅडम सुर्वे मॅडम उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी 50 विद्यार्थी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शरद झोळ सर यांनी केले तर आभार वीरेंद्र गलांडे सर यांनी मानले.
Comments
Post a Comment