हर्षवर्धन पाटील रुग्णालयात असूनही कामात व्यस्त
- मुंबईत ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल  
             राज्याचे माजी सहकार मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी गुरुवारी (दि.30) दाखल झाले आहेत. त्यांची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांचेवर रुग्णालयात उपचार चालू आहेत. रुग्णालयांमध्ये उपचार घेत असतानाही त्यांचे कार्यकर्त्यांशी संपर्क, संस्थांचे कामकाज अशा दैनंदिन कामकाजामध्ये खंड पडलेला नाही. सतत कामांमध्ये व्यस्त राहण्याच्या स्वभावामुळे आजारी असूनही हर्षवर्धन पाटील हे व्हॉट्सऍप, दूरध्वनीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी, जनतेशी संपर्कात आहेत.
           सध्या ब्रीच कँडी रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली हर्षवर्धन पाटील उपचार घेत आहेत. आवश्यक विविध वैद्यकीय तपासण्यांचे त्यांचे रिपोर्ट नॉर्मल आहेत. आज शुक्रवारी हर्षवर्धन पाटील यांची तब्येत उत्तम आहे, थोडाफार थकवा जाणवत आहे. मात्र दैनंदिन कामकाज रुग्णालयात असूनही नेहमीप्रमाणे सुरु आहे. ब्रीच कँडी रुग्णालयातून हर्षवर्धन पाटील यांना लवकर घरी सोडण्यात येईल, अशी माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली. 
____________________________

Comments

Popular posts from this blog