कासार बालकुंदा येथील कलशारोहन व मूर्ती प्राणप्रतिष्ठा संपन्न..
निलंगा तालुक्यातील कासार बालकुंदा येथे सिद्धेश्वर मंदिराचे कलशारोहण व प्राणप्रतिष्ठा संपन्न झाले. मनिप्र राजेश्वर शिवाचार्य महाराज तडोळा, मनिप्र कोरणेश्वर महास्वामीजी उस्तुरी यांची प्रवचने झाली. दिवसभर शिव भजनाचा व संगीत भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कासार बालकुंदा गावातील 151 लिंगायत भाविकांनी सद्गुरु राजेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याकडून दीक्षा घेतली.
दिनांक 20 रोजी सकाळी होम हवन यज्ञ करून कलशारोहन व मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात आले. त्याप्रसंगी कासार बालकुंदा, तांबाळा, सरदार वाडी हल्लाळी, उस्तुरी तसेच परिसरातील गावातील भाविकांची गर्दी पाहायला मिळाली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बसवराज लेंडोळे, रणजीत कोकणे, शरणाप्पा कोकणे, माणिक अप्पा कोकणे, पंडित कोकणे, प्रताप कावले, भागवत महाराज, मिलिंद लातुरे, नितीन पाटील, विरभद्रप्पा कोकणे, वैजनाथ मेडोळे, सदानंद मेंडोळे त्र्यंबक पाटील तसेच गावातील नागरिकांनी सहकार्य केले.
Comments
Post a Comment