पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड,..
प्रतिनिधी.. धनश्री गवळी इंदापूर.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नूतन संचालक पदी महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री दत्ता मामा भरणे यांची संचालक म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.
वर्ग ब प्रतिनिधी मधून सलग सहा वेळा दत्ता मामा भरणे यांची संचालकपदी निवड करण्यात आली. इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य लोकांपर्यंत विकासाची गंगा पोहोचण्याचे काम यांच्या माध्यमातून सतत होत आहे, आणि यापुढील काळात ते विकासाची कामे करणार आहेत असे उदगार इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष व अवसरी गावचे सुपुत्र श्री प्रशांत कवितके यांनी माय मराठी न्यूज चे पत्रकार यांच्याशी बोलताना सांगितले.
Comments
Post a Comment