कर्मयोगी कारखान्याच्या इथेनॉल उत्पादनाचा हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते शुभारंभ 
इंदापूर : प्रतिनिधी... धनश्री गवळी,माय मराठी न्यूज चॅनल.
        महात्मा फुलेनगर (बिजवडी ) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचा चालु सन 2021-22 च्या हंगामातील इथेनॉल उत्पादनाचा शुभारंभ कारखान्याचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते बुधवारी (दि.22) उत्साही वातावरणात करण्यात आला.
       कर्मयोगी कारखान्याकडून देशातील ऑइल कंपन्यांना 81 लाख लि. इथेनॉलचा पुरवठा केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे नेतृत्वाखालील केंद्र सरकारने इथेनॉल धोरणाची यशस्वीपणे अंमलबजावणी सुरु केल्याने साखर उद्योगाला मोठा दिलासा मिळाला आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. कर्मयोगी कारखान्याचा चालू गळीत हंगाम उत्कृष्टपणे चालू असून, कारखान्याने आज (दि.22) अखेर 3 लाख 31 हजार मे. टन ऊसाचे गाळप पुर्ण केले असून सहवीज निर्मिती व इतर उपपदार्थ निर्मितीचे प्रकल्प पूर्ण कार्यक्षमतेने चालू आहेत,अशी माहीतीही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी दिली. 
       प्रारंभी हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते उत्पादित इथेनॉलचे पूजन करण्यात आले. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा,  हनुमंत जाधव, शांतीलाल शिंदे, रवींद्र सरडे, छगन भोंगळे, प्रदीप पाटील, राहुल जाधव, अंबादास शिंगाडे, पराग जाधव, विश्वास देवकाते, निवृत्ती गायकवाड, भूषण काळे, प्रवीण देवकर, रतन देवकर, केशव दुर्गे, सतीश व्यवहारे, हिरा पारेकर, वसंत मोहोळकर, शारदा पवार, कांचन कदम, कार्यकारी संचालक देवराव लोकरे, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 
_________________________
फोटो- कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याच्या इथेनॉल उत्पादनाचा शुभारंभ प्रसंगी हर्षवर्धन पाटील व मान्यवर .

Comments

Popular posts from this blog