हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते बैलगाडा शर्यतीच्या गाण्याचे पोस्टर प्रदर्शित
इंदापूर: प्रतिनिधी दि.25/12/21
राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते मराठी अभिनेते ऋषी काळे व आदित्यराजे मराठे या जोडीच्या ' नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत ' या गाण्याचे पोस्टर इंदापूर येथे गुरुवारी (दि.23) प्रदर्शित करण्यात आले. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी दोन्ही युवा अभिनेत्यांचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या. युवा अभिनेते ऋषी काळे यांनी यापूर्वी अभिनय क्षेत्रात अल्प कालावधीत लक्षवेधी कामगिरी केली आहे. आगामी काळात हिंदी चित्रपटात ते राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकांबरोबर काम करणार आहेत. याकरीताही हर्षवर्धन पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा व्यक्त केल्या.
___________________________
फोटो :- बैलगाडा शर्यतीच्या गाण्याचे पोस्टर प्रदर्शित प्रसंगी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील.
Comments
Post a Comment