लवकरात लवकर निर्णय न झाल्यास ओबीसीचा राज्यभर आंदोलनाचा इशारा.... तालुका अध्यक्ष पांडुरंग शिंदे.
  प्रतिनिधी.. धनश्री गवळी इंदापूर माय मराठी न्यूज
    ओ बी सी चा निर्णय योग्य वेळेत न झाल्यास ओ बी सी समाज राज्यभर आंदोलन करणार आहे असा खणखणीत इशारा भाजप ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी इंदापूर येथे आंदोलन दरम्यान सांगितले. ओबीसी समाजाला शासकीय लाभ मिळणे बंद झाल्याने इंदापूर तालुका ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने इंदापूर शहर बंद ठेवण्यात आले होते यावेळी मोर्चाचे नियोजन करण्यात आले होते तसेच रस्ता रोको आंदोलन करून सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केला आज सकाळी ठीक अकरा वाजता संत सावतामाळी नगर येथून मोर्चाला सुरुवात झाली होती. बाबा चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते यानंतर इंदापूर नगरपरिषद येथील मैदानावर सरकारचा जाहीर निषेध नोंदवला आहे जातिनिहाय जनगणना  झाल्यास लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसींचा वाटा योग्य मिळेल केंद्रीय अर्थसंकल्प प्रमाणे दरवर्षी दहा लाख कोटी रुपये तर राज्याच्या अर्थसंकल्पात पन्नास हजार कोटीची तरतूद होईल लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाचा फायदा होईल तसेच लोकसभेत व विधानसभेत राखीव जागा मिळतील. विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती मिळेल. जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायती मध्ये ओबीसींच्या जागा सोडून निवडणुका दामटण्याचा प्रयत्न सुरू आहे तो निश्चितच निषेधार्थक आहे त्यामुळे अनेक ठिकाणी गोंधळाच्या परिस्थितीत निवडणूका होत असल्याने मतदारांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. यावेळी या मोर्चामध्ये माजी उपनगराध्यक्ष पांडुरंग शिंदे तसेच नाभिक महामंडळ पुणे जिल्हा अध्यक्ष रमेश राऊत बंडू शिंदे भटक्या विमुक्त जाती जमाती अध्यक्ष तानाजी धोत्रे पोपट पवार नितीन आरडे मोहन देवकर राजकुमार राऊत तसेच इतर अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने रास्ता रोको आंदोलनासाठी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog