राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी...
श्री हनुमान विद्यालय अवसरी येथे आज राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साह मध्ये शासनाच्या नियमांचे पालन करून साजरी करण्यात आली.
इंदापूर तालुक्यातील
अवसरी येथील माध्यमिक विद्यालया मध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली शासनाने नेमून दिलेल्या कोरोना नियमाचे पालन करून इयत्ता नववी व दहावी तील विद्यार्थी यांच्यासमवेत तसेच विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयातील शिक्षक श्री वाघमारे सर यांनी स्वीकारले तर विवेकानंद यांचे फोटोचे हार घालून विनम्र अभिवादन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री लोंढे सर यांनी केले तसेच राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला हार घालून प्रतिमेची पूजा संस्कृत विभाग प्रमुख सौ कवडे मॅडम व लोंढे मॅडम यांनी केले तसेच यावेळी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या बद्दल ऐतिहासिक माहिती विद्यालयाचे शिक्षक श्री रसाळ सर यांनी दिली यावेळी विद्यालय मध्ये विद्यार्थ्यांची थोडक्यात भाषणे झाली या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री घळके सर यांनी केले तर आभार प्रदर्शन गवळी सर यांनी केले. या कार्यक्रमासाठी विद्यालयातील लिपिक,कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक शांतीलाल शिंदे तसेच विद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी हरिभाऊ कवितके, राजेंद्र पेंडवळे, प्रकाश मगर तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
Comments
Post a Comment