कौशल्य विकास व प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन .....
सोलापूर प्रतिनिधी ...वैभव यादव. माय मराठी न्यूज चॅनल.
गेली दोन वर्षे झाले कोरोनाच्या प्रादुर्भाव असल्याने कित्येकांचे रोजगार गेले.त्यात समाजात भिक्षा मागून जगणाऱ्या,स्थलांतरीत होणाऱ्या,वेश्या व्यावसाय करणाऱ्या,घरकाम करणाऱ्या अशा विविध घटकांतील मुली व महिला यांच्यावर खूप मोठे संकट निर्माण झाल.
आपण प्रार्थना फाऊंडेशन च्या माध्यमातून गेली चार पाच वर्षे झाला समाजातील विविध घटकांवर काम करत आहोत.त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केला जातोय.सोलापूरचे पोलीस आयुक्त हरीश बैजल सरांची भेट घेण्यासाठी मी आणि अनु गेली असता संस्थेची पार्श्वभूमी व कामाच्या संदर्भात चर्चा झाली.समाजातील वंचित,निराधार, भिक्षा मागणाऱ्या मुली स्वतःच्या पायावर उभ्या रहाव्यात या साठी शिलाई मशीन ट्रेनिंग सुरू केल्याचे ही सांगितले.मुलींना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सरांनी एक संकल्पना मांडली पण त्या साठी मोठ्या यंत्रणेची आवश्यकता होती.सरांनी गारमेंट क्षेत्रात कार्यरत असलेले अमित जैन सर,सतीश पवार सर तसेच आल्हाद आपटे सर व हेरिटेज चे मलाक मनोज शहा सरांची भेट करून दिली.अमित जैन सर व सतीश पवार सर यांनी लागणाऱ्या सर्व मशीन व ट्रेनिंग देण्याचे आश्वासन दिले पण जागेचा खूप मोठा प्रश्न होता.त्या साठी आल्हाद आपटे सरांचे मित्र श्रीनिवास पल्ली सर यांनी पुढाकार दर्शवला.जागा फायनल झाली आणि सर्वांच्या सहकार्याने गारमेंट क्षेत्रात मुली व महिलांना ट्रेनिंग देऊन कायमस्वरूपी रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सुरुवातीला दहा शिलाई महिन्याच्या युनिटचे ओपनिंग करण्यात आले.पुढे जाऊन सर्वच क्षेत्रातील मुली व महिलांना ट्रेनिंग देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे व स्वतःच्या पायावर उभा करण्याचे उद्धिष्ट आहे.
या ट्रेनिंग सेंटरचे उद्घाटन करण्यासाठी आम्ही आयुक्त साहेबांना विनंती केली असतात सर म्हणाले ज्यांच्यासाठी हे सर्व करताय त्यांच्याच हस्ते उद्घाटन करू आणि आपल्या प्रकल्पातील मुलींच्या हस्ते सरांनी उद्घाटन करून घेतले.हा सर्व योग जुळून येण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे सर्वांचे आभार. या उद्घाटन प्रसंगी सोलापूरचे पोलीस आयुक्त हरीश बैजल सर सपत्नीक उपस्थित होते त्याच बरोबर, श्रीनिवास पल्ली,अमित जैन,सतीश पवार,आल्हाद आपटे,मनोज शहा,आमच्या मार्गदर्शक सीमा किणीकर मॅडम,रवींद्र लच्छा,रमेश दाकलिया,राजुभाई शहा,अजय रंगरेज,विनायक माळगे,दुमलादर काक,प्रकाश पवार,गोविंद तिरणगरी व msw चे स्वयंसेवक दीपाली मदने, सिध्दार्थ बाबरे, श्रुती गाजुल,अक्षय वटकर,सुप्रिया गायकवाड, आकाश आखाडे,विशाखा गायकवाड, मल्लेश इपोळे,भाग्योदय इपोळे आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment