शहरवासीयांनी केला शब्द सुमनांनी वर्षाव....
इंदापूर शहराच्या नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांचा आज वाढदिवस. इंदापूर शहरात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. इंदापूर शहरातील जनतेने आपल्या शब्द सुमनाने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच इंदापूर शहरातील काही भागांमध्ये विविध उपक्रम साजरे करून वाढदिवस साजरा केला यामध्ये वृक्षारोपण तसेच तिळगुळ वाटप कार्यक्रम करून साजरा केला तसेच यावेळी सामाजिक राजकीय व्यवसायिक क्षेत्रामधून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. वृक्षांना हार घालून बायो डायव्हर्सिटी पार्कमध्ये केक कापून वाढदिवस साजरा केला. यावेळी कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, इंदापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे, सामाजिक कार्यकर्त्या सायरा आतार, अमीन आतार ,जावेद शेख, तसेच नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते
Comments
Post a Comment