महाराष्ट्राची एन. डी. पाटील यांच्या निधनाने अपरिमित हानी - हर्षवर्धन पाटील
इंदापूर: प्रतिनिधी दि.17/1/22
प्रा. एन. डी. पाटील राज्याचे थोर विचारवंत तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक होते. महाराष्ट्राच्या राजकीय, सहकार, सामाजिक, शैक्षणिक जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. प्रा. एन. डी. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्राची अपरिमित हानी झाली आहे, या शब्दात राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
प्रा. एन.डी.पाटील यांनी 93 वर्षाच्या आयुष्यामध्ये तब्बल 70 वर्ष शेतकरी, कष्टकरी, महीला, वंचित या घटकांसाठी झोकून देऊन काम केले. पुरोगामी चवळवीचे ते नेते होते. राज्याचे सहकार मंत्री म्हणूनही त्यांनी प्रभावीपणे काम केले. विधान परिषद सदस्य, विधानसभेचे आमदार म्हणून त्यांनी सर्वसामान्य जनतेचा आवाज विधिमंडळामध्ये गाजविला. शेकापच्या जडण-घडणीत तसेच रयत शिक्षण संस्थेच्या प्रगतीमध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. विधिमंडळात त्यांनी अभ्यासपूर्ण भाषणे केली. मी कोल्हापूर जिल्ह्याचा 10 वर्षे पालकमंत्री असल्याने त्यांचे काम जवळून पाहण्याचे भाग्य मला मिळाले. डॉ. एन.डी. पाटील यांच्या निधनाने राज्याचे कधीही भरून न येणारे नुकसान झाल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
फोटो :- एन. डी. पाटील.
Comments
Post a Comment