राष्ट्रीय समाज पक्ष  स्वबळावर निवडणुका लढवणार.....
  प्रदेशाध्यक्ष शेवते.
इंदापूर तालुका प्रतिनिधी.. धनश्री गवळी.
 माजी मंत्री महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्रात उभारी घेत असून भविष्यात लोकसभा व विधानसभेत राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रतिनिधी दिसून येतील असे मत नूतन प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी व्यक्त केले ते आज इंदापूर येथे पदाधिकारी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले की इंदापूर तालुक्यात राष्ट्रीय समाज पक्ष उभारी घेत असून तालुक्यातील युवक मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय समाज पक्ष कडे आकर्षित होत आहेत.इंदापुरात भविष्यात होणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढवणार आहे.

यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष शेवते म्हणाले की २०१९ चा विधानसभा निवडणुकीवेळी मित्र पक्षाकडून रासपा ची फसवणूक झाली. परंतु खचून न जाता संपूर्ण राज्यात स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे.

 यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे नूतन मुख महासचिव ज्ञानेश्वर सलगर म्हणाले की राष्ट्रीय समाज पक्ष हा नेहमी सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देणारा पक्ष आहे.रासप मुळे आज कित्येक सर्वसामान्य कुटुंबातील युवकांना सत्तेत वाटा मिळाला.

यावेळी इंदापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या वतीने नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष व मुख्य महासचिव यांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी युवा नेते अजित पाटील, किरण गोफणे,माजी अध्यक्ष सतिश शिंगाडे,तालुकाध्यक्ष सतिश तरगे, रणजीत सुळ  ऊमाजी चव्हाण, बजरंग वाघमोडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog