लक्ष्मी आई मंदिर सभामंडपाचे भूमिपूजन......
प्रतिनिधी.. धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल इंदापूर...
   अंकिता पाटील यांच्या हस्ते लाखेवाडी खाराओढा येथील लक्ष्मी आई मंदिर सभामंडपाचे भूमिपूजन..

   जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांच्या जिल्हा परिषद निधीतून मंजूर करण्यात आलेल्या ग्रामपंचायत लाखेवाडी खाराओढा येथील लक्ष्मी आई मंदिर सभामंडपाचे ( 5 लक्ष )भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांचे हस्ते करण्यात आले.
  अंकिता पाटील ठाकरे म्हणाल्या की,' धार्मिक सामाजिक सलोखा अबाधित राखण्यासाठी सभामंडपाचे स्थान मोठे आहे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत'
  या कार्यक्रमासाठी तानाजीराव नाईक,ग्रामपंचायत उपसरपंच  सोपान कृष्णा ढोले, बाळासो खराडे ,वामन निंबाळकर, आप्पासो ढोले,रामचंद्र नाईक, गोपीनाथ ढोले,रवींद्र पानसरे, शिवाजी घोगरे, नवनाथ घोगरे,रामचंद्र खराडे,किसन कोकाटे,शिवाजी गायकवाड, रामचंद्र मोहिते व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog