राज्यात भारतीय जनता पार्टी सर्वात शक्तीशाली पक्ष म्हणून समोर -हर्षवर्धन पाटील
इंदापूर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यामध्ये झालेल्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये राज्यात भारतीय जनता पार्टी सर्वात शक्तिशाली पक्ष म्हणून पुन्हा एकदा पुढे आला असल्याची माहिती राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
भाजपाच्या 24 आणि सहयोगी मिळून सर्वाधिक 30 नगरपालिकांमध्ये भाजपाने सत्ता प्राप्त केली असून
सदस्यसंख्येत सुद्धा सर्वाधिक 415 हून अधिक जागा जिंकत भाजपा हाच क्रमांक एकचा पक्ष बनला आहे.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की,' देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर जनतेने पुन्हा विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी जनता राहिल्याचे दिसून येत आहे.सर्व उमेदवारांचे, कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन आणि मतदारांचे आभार'
Comments
Post a Comment