इंदापूरच्या  पत्रकारांची तोंड भरून केली स्तुती..         
माजी उप मुख्यमंत्री, विजयसिंह मोहिते पाटील.
 पत्रकार भवनाच्या इमारतीसाठी लागेल तेवढा निधी देणार
महिला सफाई कामगारांना मोफत पैठणीचे वाटप
विविध क्षेत्रातील 11 जणांना पुरस्काराने सन्मानित
इंदापूर(प्रतिनिधी): धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल..
  इंदापूर तालुक्यातील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने जे सामाजिक क्षेत्रात काम करत असताना,तब्बल चौदा हजार गोरगरीब कुटुंबांना कोरोणा कालावधीत अन्नधान्य व साहित्याच्या रूपाने मदत पोहचवली.बावीस गावांमध्ये 22 हजार फळझाडांची लागवड केली.या समाजोपयोगी कामाचा गौरव शासनाने केला असून,अशा समाजोपयोगी कामासाठी राज्यातील पत्रकारांनी घ्यावा असे आवाहन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी केले.महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका व शहर ग्रामीण मराठी पत्रकार संघ व इंदापूर तालुका, यांच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर शहरातील नीतू मांडके सभाग्रहात पत्रकार दिनाचे आयोजन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली (ता.६ जानेवारी)रोजी करण्यात आले होते.यावेळी सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे,सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे,पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते,मुख्य सचिव सागर शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर,इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे,मयूरसिंह पाटील,शाहू शिक्षण संस्थेच्या विश्वस्त कोमलताई ढोबळे साळुंके,काँग्रेस पक्षाचे इंदापूर तालुका अध्यक्ष स्वप्नील सावंत,इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव मुकुंद शहा,इंदापूर तहसीलदार श्रीकांत पाटील,नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे,नायब तहसीलदार अनिल ठोंबरे यांच्यासह तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे बोलताना माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील म्हणाले की,राज्यातील दिग्गज पत्रकारांनी आपल्या धारदार लेखणीतून समाजाचे प्रश्न मांडून ते सोडविण्याचे काम केले आहे.तीच परंपरा आज इंदापूर तालुक्यातील पत्रकार जोपासत आहेत.ही एक अभिमानाची बाब आहे.दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक त्यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंबुर्ले गावी उभे रहावे म्हणून,आपण मंत्री असताना या कामासाठी जागा व निधी उपलब्ध करुन दिला, त्यामुळेच तिथे चांगली इमारत उभी राहून पत्रकारांना सुविधा मिळत आहेत या स्मारकाला राज्यातील हजारो पत्रकार दरवर्षी भेट देतात एक अभिमानाची बाब आहे.नीलकंठ मोहिते यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुक्यातील पत्रकारांनी सामाजिक काम करण्याचा अनोखा ध्यास घेतला आहे. यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीर उभी राहण्याची गरज आहे.असेही प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री मोहिते पाटील यांनी केले.सूर्यकांत भिसे यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या भाषणाचे वाचन केले.  यावेळी सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांनी जुनी पत्रकारिता नवी पत्रकारिता,समोर असणारी प्रचंड आव्हाने,पत्रकारांच्या समस्या यावर रोखठोक शाब्दिक प्रहार करत,इंदापूर तालुक्यात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवनासाठी निधी देण्याची भूमिका सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कबूल केली आहे.त्यामुळे पत्रकारांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार आहे.खऱ्या अर्थाने इंदापूर तालुक्याचे नेतृत्व कैलासवासी शंकरराव पाटील यांनी केले,गणपतराव पाटील यांनी केले त्यानंतर लोकांची खरी गरज ओळखून मार्गी लावण्याची भूमिका राज्यमंत्री भरणे करीत आहेत.असा शाब्दिक गौरव प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांनी केला.यावेळी शाहू शिक्षण संस्थेच्या विश्वस्त कोमलताई साळुंके - ढोबळे,राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पत्रकार बंधूना शुभेच्छा दिल्या. पत्रकार संघाच्या वतीने आदर्श शैक्षणिक संस्था चालक वीरसिंह रणसिंग,आदर्श सामाजिक कार्य अंकिता मुकुंद शहा,आदर्श शैक्षणिक संस्था श्रीमंत ढोले,सहकार रत्न किशोर पवार, उत्कृष्ट वैद्यकीय सेवा विनोद राजपुरे,युवा उद्योजक बापूराव गायकवाड,आदर्श शिक्षक वसंतराव फलफले,शेतीनिष्ठ शेतकरी साहेबराव मोहिते,कलागौरव शिवकुमार गुणवरे,आदर्श राज्य गायिका राधा खुडे यांना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री दत्तात्रय भरणे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते,मुख्य सचिव सागर शिंदे,उपाध्यक्ष संदीप सुतार,
बाळासाहेब कवळे,भीमराव आरडे,शिवाजी पवार,दत्तात्रय गवळी,तात्याराम पवार मनोज साबळे भीमसेन उबाळे प्रेमकुमार धर्माधिकारी,आदम पठाण यांनी विशेष परिश्रम घेतले.तर कार्यक्रमाचे आभार तानाजी काळे यांनी मानले.
" इंदापुरातील पत्रकार भवनासाठी लागेल तेवढा निधी देणार "
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने इंदापूर तालुक्यातील जनतेला गरज होती त्यावेळेस मोलाची मदत अन्य धान्य पुरवून केलेली आहे.वृक्षारोपण यामध्ये देखील गावोगावी शाश्वत काम पत्रकार संघाने केली आहे.व सामाजिक कामांमध्ये भरीव कामगिरी करण्याची भूमिका या पत्रकार संघाची असल्याने.त्यांच्या मागणीनुसार इंदापूर येथे पत्रकार भवनासाठी लागेल तेवढा निधी देणार असल्याची घोषणा सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली.
" शेकडो सफाई कामगार महिलांना मोफत पैठणीचे वाटप "

पत्रकार संघाने महिला सफाई कामगारांना पैठणी मोफत देऊन,सफाई महिला कामगारांचा अनोखा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केला.तर दर्पणकार पुरस्काराने राहुल ढवळे,आदम पठाण,भीमराव आरडे, तानाजी काळे,गोकुळ टांकसाळे,उदय शहा जाधव देशमुख यांना माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

Comments

Popular posts from this blog