व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारा कोरोना वर योग्य  निर्णय घेऊन खबरदारी घेण्याच्या दिल्या सूचना...
इंदापूर तालुका प्रतिनिधी.. धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल.
   कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता त्यावर योग्य उपाययोजना व्हावी यासाठी लाखेवाडी जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषदेच्या सर्व डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी यांच्या समवेत जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता पाटील -ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला तसेच योग्य उपाययोजना करण्यासंदर्भात सूचना केल्या.
   कोरोनाचे संकट पुन्हा दिवसेंदिवस वाढत चालले आहे. भविष्यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन येणारे संकट टाळण्यासाठी प्रलंबित असलेले लसीकरण व इतर उपाय योजना संदर्भात यावेळेस चर्चा करण्यात आली.
     अंकिता पाटील -ठाकरे म्हणाल्या की,' पुन्हा एकदा महाभयंकर असे कोरोनाचे संकट आले असून यामध्ये कोरना बरोबरच ओमायक्रोनचे देखील संकट वाढले असल्याने याविरुद्ध उपयोजना व्हावी यासाठी आपण सर्वांनी पूर्ण कार्यक्षमतेने प्रयत्न केले पाहिजे.'

Comments

Popular posts from this blog