तुकाराम झांबरे यांचेवर बारामती येथे अंत्यसंस्कार
   - मान्यवरांकडून श्रद्धांजली अर्पण 
इंदापूर : प्रतिनिधी... धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल
         जुन्या पिढीतील बागातदार व प्रसिद्ध आडत व्यवसायिक तुकाराम (बापू) दादासाहेब झांबरे (मळद ) यांचे पार्थिवावर रविवारी (दि. 23) बारामती येथे शोकाकुल वातावरणात  अंत्यसंस्कार करण्यात आले. तुकाराम झांबरे यांचे वृद्धापकाळाने शनिवारी (दि.22) रात्री बारामती येथे निधन झाले. मृत्यूसमयी ते 87 वर्षांचे होते. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे ते सासरे होत.
            तुकाराम (बापू ) झांबरे यांचे व्यक्तिमत्त्व करारी व संयमी होते. आयुष्यभर त्यांनी शेतकरी व नागरिकांना मदत केली. त्यांचे पाठीमागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. इंदापूर तालुका जिजाऊ महिला बचत गट फेडरेशनच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील तसेच उद्योजक सुनील झांबरे व अनिल झांबरे यांचे ते वडील होत. बारामती येथे अंत्यसंस्कार प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली.
_____________________________
फोटो - तुकाराम झांबरे,बारामती.

Comments

Popular posts from this blog