श्री हनुमान विद्यालय अवसरी येथे विद्यार्थ्यांना कोरोना लसीचा दिला पहिला डोस.....
 इंदापूर तालुका प्रतिनिधी.... धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल..
    आज इंदापूर तालुक्यातील अवसरी येथील माध्यमिक विद्यालय मध्ये इयत्ता नववी व दहावी मध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना कोरोना लसीचा प्रथम डोस देण्यात आला.
    श्री हनुमान विद्यालय अवसरी मधील नववी व दहावी मधील शिकत असलेल्या मुले व मुली यांना शासनाच्या नियमाप्रमाणे कोव्हाकसीन  चा पहिला डोस देण्यात आला. डोस घेण्यासाठी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या मध्ये आनंदी वातावरण तयार झाले होते. लस घेताना विद्यार्थी जेवन करून आले होते, त्याना लस घेतल्यानंतर पॅरासिटामोल या गोळ्या देण्यात आल्या. लस घेताना प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकांना शाळेत बोलण्यात आले होते  मुलांना लस दिल्यानंतर त्यांच्या पालकांसोबत त्यांना योग्य सूचना देऊन घरी पाठवण्यात आले. यानंतरचा दुसरा डोस अशाच प्रकारे काळजीपूर्वक देण्यात येणार आहे, तसेच यावेळी भांडगाव व अवसरी येथील 178 मुल व मुली यांना लस दिली, अशीही माहिती यावेळी सुरवड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविका सौ बुधावले मॅडम यांनी माहिती दिली.. 
यावेळी मदतनीस रूपाली पांढरे, आशा सेविका अर्चना माने, संगीता फलफले, सीमा तीकोटे, डाटा ऑपरेटर गणेश तिकोटे, तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री लोंढे सर, तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी मदतीसाठी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog