सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून, इंदापूरात महा स्वच्छता अभियान....
प्रतिनिधी.. धनश्री गवळी इंदापूर,माय मराठी न्यूज चॅनल ‌
  इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधत आज सोमवार दिनांक 3 जानेवारी 2022 रोजी प्रभाग क्रमांक एक मध्ये महा स्वच्छता अभियान राबविण्यात आले गणपती चौक येथून या स्वच्छता अभियानाला सुरुवात होऊन इरिगेशन रोड माळवाडी रोड बाबा चौक या परिसरातील  माननीय नगराध्यक्ष सौ अंकिता मुकुंद शहा माननीय मुख्याधिकारी श्री रामराजे कापरे, आरोग्य सभापती माननीय श्री अनिकेत वाघ, कार्यालयीन अधिकारी तसेच आरोग्य विभागातील  अधिकारी व कर्मचारी यांनी या अभियानामध्ये आपला सहभाग नोंदवत येथील परिसर स्वच्छ केला.अशाच प्रकारे दररोज अभियान राबविण्यात येऊन शहरातील सर्व प्रभागांमध्ये स्वच्छता करण्यात येणार आहे तरी नागरिकांनी आपल्या परिसरांमध्ये स्वच्छता राखून व वृक्षारोपण करून स्वच्छ शासनाच्या सर्वेक्षण स्पर्धा 2022 व माजी वसुंधरा 2.0 या अभियानामध्ये आपल्या इंदापूर नगरपरिषदेचा व शहराचा देश पातळीवर प्रथम क्रमांक येण्यासाठी सहभाग नोंदवावा असे आवाहन  शहरवासीयांना माननीय नगराध्यक्ष अंकिताताई शहा व माननीय मुख्याधिकारी        श्री.रामराजे कापरे यांनी केले. इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री मुकुंद शेठ शहा, सामाजिक कार्यकर्ते श्री हमीदभाई आत्तार उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog