बावडा हलगी ग्रुपला राजवर्धन पाटील यांनी केले ड्रेसचे वाटप
इंदापूर प्रतिनिधी.. धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल..
   नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी बावडा येथील बावडा हलगी ग्रुपला ड्रेसचे वाटप केले. हलगी ग्रुपचे सदस्य रामदास गायकवाड, कुंडलिक गायकवाड तसेच इतर सदस्य यांना राजवर्धन पाटील यांच्या हस्ते निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या  ठिकाणी ड्रेसचे वाटप करण्यात आले.
  महाराष्ट्राच्या ग्रामीण सांस्कृतिक परंपरेमध्ये हलगी या वादनास महत्त्वाचे स्थान असून अलीकडे कोरोना पार्श्वभूमीवर कार्यक्रम तसेच उत्सव होत नसल्या कारणाने या पारंपरिक हलगी वाजवणाऱ्या व्यक्तींचे आर्थिक प्रश्न निर्माण झाले असल्याचे मत यावेळी राजवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
  बावडा हलगी ग्रुपच्या सदस्यांनी यावेळी समाधान व्यक्त करत राजवर्धन पाटील यांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog