वृक्ष संवर्धन करा आणि ऑक्सिजन मिळवा असा वसा दिला...
सोलापूर प्रतिनिधी... वैभव यादव.
एक रोप - एक पुस्तक अशी संक्रांतीच्या सणादिवशी वाण म्हणून अनोखी भेट दिली.
सोलापूर येथील श्री वाघमारे परिवारानी समाजापुढे एक आगळा वेगळाआदर्श घालून दिला. राजमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेऊन संस्कारक्षम शिदोरी प्रत्येकात रूजावी यासाठी हळदी कुंकाच्या माध्यमातून एक झाड एक पुस्तक वाण म्हणून अनोखी भेट दिली आहे. प्रत्येक स्त्रियांनी आपल्या घरासमोर झाडे लावावी आणि त्यांचे संवर्धन करावे. असे जर आपण केले तर भविष्यामध्ये आपणास ऑक्सिजनची कसलीही कमतरता पडणार नाही .यावेळी प्रत्येक महिलांनी आपले मत मांडले. महिलांनी उखाणे घेऊन संक्रांत रुपी सन तिळगुळ वाटून आनंदाने साजरा केला. राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्राची ओळख सर्वांना व्हावी व त्यांची प्रेरणा सर्वांना मिळावी म्हणून त्यांच्या पुस्तकांचे वाचन करण्यात आले. दूर दृष्टी कोण समोर ठेवून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या नावीन्यपूर्ण व अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करून सर्व माता भगिनी यांनी आनंद घेतला. या कार्यक्रमाचे नियोजन सौ. महानंद वाघमारे, वैष्णवी वाघमारे यांनी केले. या कार्यक्रमास मिनाक्षी कोरे, पूजा डिगे, घोरपडे मॅडम, कुंभार, नारायणकर मॅडम अशा अनेक माता भगिनी उपस्थित होत्या.
Comments
Post a Comment