इंदापूर तालुका प्रतिनिधी.. धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल.
आज इंदापूर शहरातील कसबा व परिसरातील नागरिकांनी कोरोना लसीकरणास चांगला प्रतिसाद दिला. जवळपास २०० नागरिकांनी याचा लाभ घेतला.उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.श्री.सुहास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रुग्णालयाचे परिचारक श्री.अंकुश बळगानुरे यांनी नागरिकांचे लसीकरण केले.नगरपरिषदेचे गटनेते कैलास कदम यावेळी उपस्थित होते.जिल्हा परिषद शाळा क्रमांक ६ चे मुख्याध्यापक श्री.विलास शिंदे,शाळा क्रमांक ४ चे मुख्याध्यापक श्री.वासुदेव पालवे,सौ.वैजयंता घुगे,सचिन वाघमारे, दिनेश काळे,सुनिल लोखंडे,प्रा.निशांत पवार, आशिष देवकर,आदित्य कदम यांनी विशेष सहकार्य केले.
Comments
Post a Comment