शेतकरी व तरुणांना अर्थसंकल्पातून मोठा दिलासा - हर्षवर्धन पाटील
- 7 लाख हे. शेती सिंचनाखाली आणणार
- महामार्गांचा 25000 कि.मी.ने विस्तार
इंदापूर प्रतिनिधी .. धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल
पतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखाली केंद्र सरकारने शेतकरी व तरुणांसाठी अर्थसंकल्पामध्ये विविध योजना जाहीर करून मोठा दिलासा दिला आहे. तसेच जलद प्रवासासाठी पीएम गतीशक्ती मास्टर प्लॅन तयार करून त्याद्वारे महामार्गांचा 25 हजार कि.मी.ने विस्तार करणेसाठी रु. 20 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात जलसिंचनावर भर दिला असून 7 लाख हे. शेती सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. देशाला प्रगतीकडे नेणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी (दि.1) व्यक्त केली.
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सन 2022-23 साठी केंद्रीय अर्थसंकल्प आज संसदेत मांडला जात आहे. अर्थसंकल्पामध्ये समाजातील सर्वच घटकांच्या हिताचा विचार करण्यात आला आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
देशातील तरुणांची संख्या लक्षात घेता केंद्राच्या माध्यमातून येत्या 5 वर्षामध्ये 50 लाख नोकऱ्या निर्माण करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांना डिजिटल करण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. कृषीवर आधारित स्टार्ट योजना जाहीर करण्यात आली असून नाबार्डच्या माध्यमातून तरुणांना व्यवसायासाठी भागभांडवल दिले जाणार आहे. तसेच पंतप्रधान आवास योजनेतून 80 लाख घरे बांधण्यासाठी रु. 48 हजार कोटीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी ही मोठी तरतूद असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
रसायनमुक्त व कीटकनाशकमुक्त शेती उत्पादनासाठी सेंद्रिय शेतीस चालना देणे, झिरो बजेट शेतीला प्रोत्साहन देणे, देशात तेलबियांचे उत्पादन वाढविणे, कीटकनाशकांची फवारणीसाठी किसान ड्रोनच्या वापराला चालना देणे, भूमी अभिलेखांचे डिजिटायझेशन आदी शेती क्षेत्राच्या विकासासाठी अनेक घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आरोग्याचे महत्त्व लक्षात घेता अर्थसंकल्पात आरोग्य सुविधा व नागरिकांचे लसीकरण वाढवण्यासाठी मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अतिशय कल्पकपणे अर्थसंकल्प मांडला असून, स्वागतार्ह असा हा अर्थसंकल्प असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
___________________________
Comments
Post a Comment