इंदापूर तालुका प्रतिनिधी.. धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल.
कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना यांच्या वतीने आज एक फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत ऑफिस अवसरी येथे कर्मयोगी कारखान्याचे संचालक श्री शांतीलाल शिंदे पाटील यांच्या हस्ते ऊस उत्पादक सर्व सभासदांना कर्मयोगी डिजिटल स्मार्ट कार्ड चे वाटप करण्यात आले या वेळी जुने सर्व सभासद कार्ड बंद करून नवीन कार्ड वाटप करण्यात आले. मयत सभासदांच्या वारसांना वारसा नोंद लागल्यानंतर त्यांनाही नवीन कार्ड देण्यात येणार आहे ज्या सभासदांची कार्ड हरवतील अशा सभासदांनी शंभर रुपये भरून नवीन कार्ड घ्यावयाचे आहेत असे यावेळी शांतीलाल दत्तात्रय शिंदे यांनी सांगितले.
यावर्षी कारखान्याचे जास्तीत जास्त गाळप करण्यासाठी सर्व सभासदांनी आपला सर्व ऊस कारखान्यास देऊन सहकार्य करावे. यावेळी ग्रामस्थ सरपंच संदेश शिंदे, माजी, संचालक विष्णू मोरे, अगंद तावरे, राजे प्रताप हनुमंत शिंदे, दिनेश शिंदे, शरद शिंदे, सुनील मोरे,मेजर सावंत, नवनाथ जाधव, दत्तात्रय मगर, हरिदास काटे मधुकर जाधव, दादा गायकवाड, तसेच इतर सर्व सभासद वर्ग उपस्थित होता.
Comments
Post a Comment