विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही..     अंकिता पाटील
   इंदापूर तालुका प्रतिनिधी.. धनश्री गवळी   
 ‌ निरवांगी येथील 58.5 लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटनप्रसंगी  आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब  यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यामध्ये कोट्यवधी रुपयांची विकासकामे सध्या सुरू आहे व अनेक विकास कामे पूर्ण झाली आहे.
निरवांगी येथील 58.5 लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन पुणे जिल्हा परिषद सदस्या  सौ.अंकिता पाटील ठाकरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

 निरवांगी येथील नवीन ग्रामपंचायत कार्यालयसाठी पंधरा लक्ष रुपये, पाणीपुरवठा व बंदिस्त गटार योजनेसाठी सहा लक्ष रुपये, मारुती मंदिर ते होळ शिंदे घर रस्ता कॉंक्रिटीकरण यासाठी साडेचार लाख रुपये व बी.के.बी.एन. रस्ता ते वाघुळ वस्ती रस्ता कॉंक्रिटीकरण व डांबरीकरण यासाठी 35 लक्ष रुपये आपण मंजूर केला असून अजून विविध विकास कामांसाठी लागेल तेवढा निधी आपण आदरणीय हर्षवर्धनजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मंजूर करू, असे सौ.अंकिता पाटील ठाकरे यावेळी म्हणाल्या.

 या भूमिपूजन व उद्घाटन सोहळ्याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सौ.भारतीताई दुधाळ, निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका सौ.संगीताताई दत्तात्रय पोळ, गावच्या सरपंच सौ. रेखा बाळासाहेब गायकवाड, उपसरपंच सौ.मंगल पेडकर व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog