नगरपालिका कर्मचारी झाले भाऊक.....
कर्मचा-यांनी दिली चांगल्या कामाची पावती....
इंदापूर तालुका प्रतिनिधी.. धनश्री गवळी ,माय मराठी न्यूज चॅनल
   जनतेने संधी दिली व त्या संधीचे रूपांतर जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी केले तर नक्कीच जनता डोक्यावर घेते याचा अनुभव अनेक वेळा येतो. परंतु ज्यांच्याबरोबर आपण पाच वर्षे काम केले ते कर्मचारी आपल्याला निरोप देताना भारावून जातात याचा प्रत्यय आज इंदापूर नगरपालिकेत आला.

२०१७ साली इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत जनतेतून नगराध्यक्ष झालेल्या अंकिता मुकुंद शहा यांचा कार्यकाळ आज संपुष्टात आला. त्या निमित्ताने इंदापूर नगर परिषदेत त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले होते.यावेळी कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत त्यांचे स्वागत केले. यावेळी कर्मचारी भाऊक झाल्याचे पाहायला मिळाले.

 त्यांच्या कार्यकाळात इंदापूर शहराला स्वच्छतेचे देशपातळीवरील ४ पुरस्कार प्राप्त झाले.स्वच्छ इंदापूर हरित इंदापूर, कोरोना काळात केलेले काम, शहरातील ऑक्सिजन पार्क.कामगारांचे सोडवलेले प्रश्न इंदापूर शहरातील नागरिकांशी असलेला त्यांचा संवाद, कर्मचाऱ्यांशी असलेली आपुलकी प्रेम याचा प्रत्यय आज इंदापूर शहरातील नागरिकांना तसेच नगराध्यक्ष अंकिता शहा यांना आला.

यावेळी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा,नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

कोरोना महामारी व ओबीसी आरक्षणाचा निर्माण झालेल्या पेच यामुळे १६ फेब्रुवारी रोजी मुदत  संपणाऱ्या नगर पालिकेच्या निवडणूका मुद्दतीत होऊ न शकल्याने पालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. 

बारामती येथील उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog