शिवजयंती निमित्त " रयतेचे भोजन " उपक्रमाच्या माध्यमातून ७५० गरजूंना भाकरी, पिटलं व ताक वाटप.....
      सोलापूर  प्रतिनिधी.. वैभव यादव..

 शिवजयंती निमित्त " रयतेचे भोजन " उपक्रमाच्या माध्यमातून ७५० गरजूंना भाकरी, पिटलं व ताक वाटप केले.
रॉबिन हूड आर्मी सोलापूरच्या वतीने सलग तिसऱ्या वर्षी आयोजन केले.

सोलापुरातील हाॅटेल, मंगल कार्यालय व कार्यक्रमातून शिल्लक राहिलेले अथवा ताजे अन्न गरजूंपर्यंत पोहोच करणाऱ्या राॅबीन हुड आर्मी सोलापूर च्या वतीने दररोज अन्नदान उपक्रम राबविला जातो आतापर्यंत पाच लाख पेक्षा जास्त गरजूंना अन्नदान करण्यात आले असून विविध समाजपयोगी उपक्रम राबविले जातात.  

दरवर्षी प्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करू या स्वीकार देऊया सकस आहार " रयतेचे भोजन " या उपक्रमांतर्गत सोलापुरातील १९ वस्त्यांमध्ये ७५० गरजूंना प्राप्त अन्नपदार्थ भाकरी, पिटल व ताक गरजूंना वाढून शिवजयंती साजरा करण्यात आल्याची माहिती हिंदुराव गोरे यांनी दिली. 

या वेळी क्रेडाई सोलापूर चे उपाध्यक्ष युवा उद्योजक अभिनव साळुंखे, डॉ. शिनू राऊत - सचदेव, उमेश जोशी, अनुजा मोडक यांची प्रमुख उपस्थिती होती. 

डॉ. अस्मिता कोलुर, यशोधरा हॉस्पिटल सोलापूर, धनराज पाटील, गौरी शिवगुंडे, मंदार नीळ, स्वाती जाधव, संतोष कुलकर्णी, सोमनाथ दारफळे, स्नेहल अभंगे, अनंतराज कुलकर्णी, अर्चना अघाव, ललित गुप्ता, प्रविण जवळकर, विक्रांत मंद्रुपकर, ॲड. संतोष आवळे, शितल गायकवाड, ॲड. अभिजीत इटकर, टिल्लूस अग्रो टुरिझम, शिवाजी व्हनमाने, स्मिता अडवीतोटे, डॉ. वैशाली जोशी, सिद्धराम कंकरे, आनंद जोशी आदींनी आपले योगदान दिले. 

उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. संजीव म्हमाणे, ॲड. संतोष आवळे, जितेश रोमन, अनिरुद्ध कदम, विवेक मुळे, अपूर्व जाधव, अमोल गुंड, विघ्नेश माने, रविशंकर कानाडे, योगेश कबाडे, ऐश्वर्या भैरप्पा, रोहन चव्हाण, अमृत शेटे, विपुल अलकुंटे, प्रेम भोगडे, डोंगरेश चाबुकस्वार, ऐश्वर्या शिंदे, ज्योती अभंगे, किशोर कलबुर्गी, शुभम हिटनल्ली, राहुल यलसंगी, विनायक व्हनगुंडी, कार्तिक कलबुर्गी, लक्ष्मीकांत निंबाळे, सतिश परचंडे, गोपाळ नाडीगोटू, ओंकार कांबळे, राहुल स्वामी, ललित गुप्ता, चंदू रुगे, लक्ष्मण फुलारी, अर्चना अघाव, वैभव दुसे, सुबोध कोळी, ओवेस पिरजादे, मुफासिर फारुकी आदींनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog