ओबीसी बहुजन परिषदेचे मुंबई येथे आयोजन.....
पुणे जिल्हा नाभिक महामंडळाचे अध्यक्ष श्री रमेश राऊत यांनी पुणे जिल्ह्यातील नाभिक बांधवांना उपस्थित राहण्याचे
इंदापूर तालुका प्रतिनिधी... धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल
नाभिक समाजाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी समाजहित व अस्तित्वासाठी मुंबई येथे दिनांक 25 फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय ओबीसी बहुजन परिषद आयोजित करण्यात आली आहे या परिषदेच्या माध्यमातून सामाजिक राजकीय स्थिरतेसाठी विचारांचे एक व्यासपीठ असल्याने पुणे जिल्ह्यातील नाभिक बांधवानी मुंबई येथे मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पुणे जिल्हा नाभिक महामंडळाचे अध्यक्ष श्री रमेश राऊत यांनी केली आहे.
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृह मध्ये शुक्रवार दिनांक 25 रोजी सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत राज्यस्तरीय बहुजन परिषद आयोजित करण्यात येणार आहे. या परिषदेसाठी,
. ओबीसी बहुजन कल्याण तथा मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार व महाराष्ट्र राज्य बारा बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष कल्याणराव दळे, यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून यावेळी या दोन मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे.
समाजातील बाराबलुतेदार ,अलुतेदार, भटके-विमुक्त जाती जमाती, तसेच एस बी सी, ओबीसी मुस्लिम, आदिवासी समाज, तसेच मागासवर्गीय समाज व इतर सर्व वंचित असलेल्या जाती जमाती समूहाच्या संविधानिक अधिकाराची बाजू या परिषदेमध्ये मांडली जाणार आहे . असे इंदापूर तालुका नाभिक महामंडळाचे अध्यक्ष श्री अवधूत पवार यांनी सांगितले.
तसेच या परिषदेमध्ये सामाजिक यशाच्या दिशेने पाऊल उचलले गेलेले आहे. यातूनच समाजामध्ये सामाजिक व राजकीय चळवळ उभी केली जाणार आहे. म्हणूनच समाजातील सर्व घटकांनी यावेळी उपस्थित राहावे असे इंदापूर शहर नाभिक महामंडळाचे अध्यक्ष संतोष क्षीरसागर यांनी एका पत्रकाद्वारे सांगितले आहे .
Comments
Post a Comment