रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी
इंदापूर(दि.७) :- येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या वतीने सोमवार (दि.७) रोजी सकाळी १० :१५ वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात माता रमाबाई आंबेडकर यांची १२४ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी माजी नगरसेविका व संस्थेच्या अध्यक्षा आयु. शकुंतला रत्नाकर मखरे यांच्या हस्ते माता रमाईंच्या प्रतिमेस पुष्पहार, तथागत गौतम बुद्धांच्या मुर्तीस व दिवंगत रत्नाकर मखरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव ॲड.समीर मखरे, संचालक गोरख तिकोटे, संचालिका अस्मिता मखरे, संस्थेतील प्राचार्या,उप- प्राचार्या, मुख्याध्यापक,शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले.
Comments
Post a Comment