इंदापूर तालुका प्रतिनिधी..
धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल..
मनुष्यबळ विकास लोक सेवा विकास अकादमी पुणे यांच्या वतीने गुणीजन गौरव पुरस्कार 2022 यांचे वितरण पुणे येथे करण्यात आले. हा पुरस्कार राज्यस्तरीय व राष्ट्रस्तरीय पुरस्कार मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने या पुरस्काराचे वितरण दरवर्षी होत असते. या विशेष सन्मान सोहळ्यामध्ये इंदापूर तालुक्यातील श्री हनुमान विद्यालय अवसरी मधील सहशिक्षक श्री नानासाहेब शंकर घळके यांना गुणीजन गौरव पुरस्कार प्रधान करण्यात आला . या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ह भ प श्री श्याम सुंदर महाराज आळंदीकर होते तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक रमेश आव्हाड हे उपस्थित होते. तसेच डॉक्टर जे सानी पिना राव इंटरनॅशनल टॅलेंट आयकॉन विशाखापट्टण, तसेच महापरिषद समन्वयक प्रकाश सावंत, समारंभ मार्गदर्शक व समाजसेविका सौ मीनाक्षी गवळी, शिक्षण तज्ञ व प्रसिद्ध वक्ता सौ मनीषा कदम, तसेच एल एस दाते, शशीकांत सेलुकर, चंद्रकांत गावंड, प्रसिद्धीप्रमुख अमोल सुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला होता. पुरस्कार प्रेरणा देतात व प्रेरणेने राष्ट्र मोठे होते असे यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ह भ प श्याम सुंदर महाराज यांनी सांगितले.हा पुरस्कार दिनांक 10/3/2022रोजी पुणे येथे देण्यात आला.
Comments
Post a Comment