विजयसंकल्प मेळाव्याचे आयोजन......

     प्रतिनिधी... वैभव यादव सोलापूर माय‌ मराठी न्यूज चॅनल.. 
     
        महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थिती आमदार प्रणिती शिंदे यांच्या वतीन पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी विजयसंकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते...
हेरिटेज येथे नाना पटोले यांचे आगमन झाल्यानंतर महापालिकेचे गटनेते चेतन नरोटे आणि शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सुशील बंद पट्टे यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले..
सदर कार्यक्रमावेळी आमदार नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना येणाऱ्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले..
शहरात सध्या सुरू असलेल्या काँग्रेस सभासद नोंदणी बद्दल बोलताना नाना पटोले यांनी डिजिटल सभासद नोंदणी मुळे काँग्रेस घराघरात पोहोचत आहे आणि कार्यकर्ता हा माणसाची जोडला जात आहे हाच या मोहिमे मागचा उद्देश असल्याचे सांगितले व सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सभासद नोंदणी अधिकाधिक करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले... सदर कार्यक्रमावेळी शहरात सर्वात जास्त डिजिटल सभासद नोंदणी केलेले शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सुशील बंदपट्टे नगरसेविका फिरदोस पटेल सागर शहा आणि कुणाल गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला डिजिटल नोंदणी मोठ्या प्रमाणात केल्याने नाना पटोले यांनी त्यांचे कौतुक ही केले...सदर कार्यक्रमाप्रसंगी आमदार प्रणिती शिंदे यांनी बोलताना जोपर्यंत कार्यकर्ते आहेत तोपर्यंत काँग्रेस पक्ष कोणीही संपू शकणार नाही असे गौरउदार काढले आणि काँग्रेस निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळे जिवंत असल्याचे सांगत सर्व निष्ठावंत यांचे आभार मानत विरोधकांना चांगलाच टोला लगावला..

Comments

Popular posts from this blog