इंदापूर तालुका प्रतिनिधी... धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल.
कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने इयत्ता दहावी माध्यमिक परीक्षा केंद्र ज्या शाळेत विद्यार्थी शिकत आहे त्याच शाळेत परीक्षा घेण्यासाठी सूचना दिल्या.
दिनांक 15 मार्च पासून इयत्ता दहावीचे पेपर आपण ज्या शाळेमध्ये शिकतो त्या शाळेमध्ये घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, म्हणून अगदी आनंदी वातावरणामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी इयत्ता दहावीचा वार्षिक पेपर देण्यासाठी शाळे मध्ये दाखल झाले. या मुलांचे स्वागत करण्यासाठी शाळेने ही चांगला निर्णय घेतला. विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी आज श्री हनुमान विद्यालय अवसरी येथे विद्यार्थ्यांना औक्षण करून गुलाबाचे फुल साखर वाटून , यावेळी विद्यार्थ्यांचे टेंपरेचर तपासण्यात आले, तसेच सॅनिटायझर व मास्क देण्यात आले,त्याना पेपर साठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या , मुलांना ही खुप आनंद झाला होता. यावेळी मुलांसोबत त्यांचे पालक ही उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन श्री अरुण दादा शिंगटे, संस्थेच्या मार्गदर्शिका व माजी मुख्याध्यापिका सौ विजया शिंगटे तसेच मुख्याध्यापक श्री प्रवीण लोंढे तसेच विद्यालयातील शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment