जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील-ठाकरे यांच्या निधीतून भजनी मंडळांना साहित्याचे वाटप.....
   
      ‌ इंदापूर तालुका प्रतिनिधी... धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल...

       जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील -ठाकरे यांच्या निधीतून डाळज, टणू, बोराटवाडी येथील भजनी मंडळास भजनी साहित्य मंजूर करण्यात आले असून आज इंदापूर येथे अंकिता पाटील-ठाकरे यांच्या हस्ते भजनी मंडळास साहित्याचे वाटप करण्यात आले.
  डाळज नं.3  येथील प्रगती महिला भजनी मंडळ, टणू येथील भर्तरीनाथ भजनी मंडळ व बोराटवाडी येथील हनुमान भजनी मंडळास भजनी साहित्य उपलब्ध करून दिले आहे यामध्ये पकवाज, वीणा, टाळ, मृदुंग यांचा समावेश आहे.
  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत भजनाच्या परंपरेला अधिक महत्त्वाचे स्थान असून आनंद द्विगुणीत करण्यासाठी भजनी साहित्य उपलब्ध करून दिले असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील-ठाकरे यांनी दिली.
    निरा भिमा कारखाना  संचालक दत्तू आण्णा सवासे ,कर्मयोगी कारखाना संचालक मानसिंग तात्या जगताप , दयानंद गायकवाड , टणू गावचे सरपंच शितलभैया मोहिते,बलभीम नरहरी मोहिते यावेळी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog