राज्यमंत्र्यांनी सन्मानचिन्ह देऊन केला सत्कार.....
 इंदापूर तालुका प्रतिनिधी.. धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल...
   
      इंदापूर तालुक्याचे आमदार दत्ता मामा भरणे यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पल्लवी चा सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.
     भिगवण ता इंदापूर येथील पल्लवी सोनोने दूरचित्रावाणीच्या माध्यमातून घराघरामध्ये पोहोचलेली आहे .पल्लवी सोनोने यांना महिला दिनानिमित्त भारत इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल च्या वतीने वूमन सिनेमा अँड आर्टस् इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.त्यानिमित्ताने तावशी ता इंदापूर येथील जाहीर कार्यक्रमात पल्लवी सोनोने यांना महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला ,यावेळी त्यांचेसमवेत लागीर झाल जी फेम कल्याणी सोनोने,व चौधरी यांचा ही सन्मान केला.यावेळी भिगवण चे सचिन बोगावात, आण्णा धवडे,अजिंक्य माडगे,प्रमोद बंडगर, मनोज राक्षे आदी मान्यवर उपस्थित होते .सर्व सामान्य कुटुंबातील पल्लवी सोनाने व कल्याणी सोनोने या सख्या बहिणींनी कला क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी बजावत इंदापूर तालुक्याचे नाव देशात झळकवण्याचे काम केले आहे असे यावेळी दत्तात्रय भरणे यांनी सांगितले, व येणाऱ्या काळामध्ये तिला तिच्या कामासाठी  हार्दिक शुभेच्छा  तिचे कौतुक केले.

Comments

Popular posts from this blog