उमेश (गोट्या) क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिल्या शुभेच्छा
इंदापूर तालुका प्रतिनिधी.. धनश्री गवळी माय‌ मराठी न्यूज चॅनल...
   युवा नेतृत्व उमेश (गोट्या) क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर येथील राजेवलीनगर मधील आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून माजी मंत्री व भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी उमेश (गोट्या) क्षीरसागर यांना शुभेच्छा दिल्या.
   हर्षवर्धन पाटील म्हणाले की,' युवक संघटनाचे मोठे कार्य उमेश क्षीरसागर यांनी केले असून ही युवा शक्ती विधायक कार्यासाठी तसेच सामाजिक कार्यासाठी उपयोगी यावी अशी सदिच्छा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त करीत उमेश क्षीरसागर यांच्या पाठीशी सदैव आपण असेल असे यावेळी त्यांनी सांगितले.
   यावेळी युवकांचा मोठा जनसमुदाय वाढदिवसानिमित्त उपस्थित होता.

Comments

Popular posts from this blog