भिमाई आश्रमशाळेत सावित्रीबाई फुलेंना स्मृतीदिनी अभिवादन.
इंदापूर तालुका प्रतिनिधी.. धनश्री गवळी
सावित्रीबाई फुले ह्या पहिल्या स्री शिक्षिका.त्यांनी सर्व जाती धर्मातील मुलींना मोफत शिकविले.त्या अन्याय अत्याचाराविरुद्ध लढल्या. त्यांनी अनिष्ट रुढी परंपरेला कडाडून विरोध केला. सावित्रीबाई अत्यंत संवेदनशील व कारुण्यमय मनाच्या होत्या.
सावित्रीबाईंचे महिलांसाठी शैक्षणिक कार्य महान असल्याचे गौरोद्गार माध्यमिक व उच्चमाध्यमिक आश्रम शाळेच्या उप- प्राचार्या सविता गोफणे यांनी काढले. त्या भिमाई आश्रमशाळेत आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.
मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी ट्रस्टच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेच्या फातिमा शेख मुलींचे अनुदानित वसतिगृहाच्या अधिक्षिका निता भिंगारदिवे यांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेस पुष्पहार, दिवंगत रत्नाकर मखरे (तात्या)यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रशालेतील मुलींनी सावित्रीबाईंच्या जीवनावर गीतं गायीले.तर काही मुलींची भाषणं झाली.
यावेळी कार्यक्रमास संस्थेतील सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन हिरालाल चंदनशिवे यांनी केले.
Comments
Post a Comment