वाशिंबेकर बापू यांच्या पुण्यतिथी भव्य रक्तदान शिबिर......
इंदापूर तालुका प्रतिनिधी.. धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल...
कै.आ.धनंजय (बापू) वाशिंबेकर यांच्या ७ व्या पुण्यतिथी निम्मित भव्य रक्तदान शिबिर इंदापूर शहरातील अखिल मंडई येथे आयोजित केले होते.या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करणारे रक्तदाते नागरी सुरक्षा पॉलिसी देण्यात आली. तसेच आदरणीय धनंजय बाप्पू वाशिंबे कर वर मेमोरियल फाउंडेशन च्या माध्यमातून इंदापूर शहरातील शेख मोहल्ला याठिकाणी चालू असलेले मज्जिद च्या कामाकरिता रुपये.11111 . देण्यात आले. या रक्तदान शिबिरामध्ये 205 रक्त बाटल्या संकलित झाल्या होत्या .
या कार्यक्रमाचे चे उद्घाटन राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष, प्रदिप दादा गारटकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी इंदापूर शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते पोपट शिंदे, गटनेते गजानन गवळी, नगरसेवक अमर गाडे, अनिकेत वाघ, स्वप्नील राऊत, मंडळाचे अध्यक्ष व नगरसेवक अतुल शेटे पाटील, प्रशांत मामा उंबरे, सोमनाथ तात्या खरवडे, संदीप वाशिंबेकर, भावेश ओसवाल, इमरान शेख, जावेद मुलानी, राहुल चित्राव, मुनीर शेख, विकी पवार, व्यंकटेश वाशिंबेकर, केदार वाशिंबेकर, यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते....
Comments
Post a Comment