ग्रामीण भागात एसटी बस सुरू करण्यात यावी........
सोलापूर प्रतिनिधी... वैभव यादव माय मराठी न्यूज चॅनल......
गेल्या दोन वर्षांपासून कोविड महामारी मुळे महाविद्यालय बंद होती सध्या कोविडच्या परिस्थिती सावरल्यानंतर महाविद्यालय शाळा सुरू झाल्या आहेत परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहराच्या ठिकाणी महाविद्यालयात येण्यासाठी खाजगी वाहनातून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे राज्य शासनाचे या विषयाकडे दुर्लक्ष आहे दोन दिवसापूर्वी खाजगी वाहनातून शाळेला जाताना एका विद्यार्थिनीचा दुर्दैवी अपघात होऊन मृत्यू झाला. तरी आम्हा सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी आमचा प्रवास सुखकर करण्यासाठी आमच्या ग्रामीण भागातून एसटी सुरु करावी ही विनंती अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पंढरपूर यांनी एस टी आगार प्रमुख यांना निवेदन देऊन विनंती करण्यात आली, आणि लवकरात लवकर सुरू करू असे अश्वासन आगार प्रमुखांनी दिले.
Comments
Post a Comment