इंदापूर प्रतिनिधी.. धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल.
महाराष्ट्र नाभिक महामंडळ पुणे यांच्या वतीने पुणे जिल्ह्यातील इयत्ता दहावी मधील व बारावी मधील गुणवंत विद्यार्थी व नाभिक समाजातील उल्लेखनीय कार्य व समाजसेवा करणाऱ्या व्यक्तींचाही यावेळी सन्मान करण्यात येणार आहे असे महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे पुणे जिल्हा महिला अध्यक्ष सौ अनिता मगर यांनी सांगितले आहे .
हा कार्यक्रम दिनांक5/3/2022 शनिवारी सायंकाळी चार वाजता पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नटसम्राट निळू फुले रंगमंदिर पिंपळे गुरव नवी सांगवी पुणे येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे सर्व विभागीय अध्यक्ष तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष यांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे. या कार्यक्रमासाठी कल्याण रावजी दळे साहेब स्वतः उपस्थित राहणार आहेत. तेव्हा पुणे जिल्ह्यातील नाभिक बंधू-भगिनी समाज बांधव तसेच सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील सर्वांनी उपस्थित रहावे असे आव्हान महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे पुणे जिल्हा अध्यक्ष श्री रमेश राऊत यांनी केले.
Comments
Post a Comment