इंदापूर तालुका प्रतिनिधी.. धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल....
डाळज नंबर 2 येथील पिरसाहेब यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धेसाठी राजवर्धन पाटील यांची उपस्थिती....
डाळज नंबर 2 येथील पिरसाहेब यात्रा निमित्त आयोजित कुस्ती आखाड्यास निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी भेट देऊन कुस्ती मल्लांना प्रोत्साहन दिले.
कोरोना कालखंडानंतर गावोगावी यात्रेनिमित्त आखाड्यातील कुस्ती स्पर्धा सुरू झाली असून नागरिकांमध्ये एक वेगळ्या प्रकारचे नवचैतन्य निर्माण झाले आहे डाळज नंबर 2 येथील यात्रा मोठ्या उत्साहात भरत असते राजवर्धन पाटील यांनी यात्रेनिमित्त या आखाड्यास भेट दिली आणि गावोगावच्या या परंपरा नागरिकांमध्ये उत्साह निर्माण करत असल्याचे तसेच युवकांची शारीरिक क्षमता निर्माण होण्यासाठी कुस्तीला असलेले महत्त्व यातून दिसते असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
Comments
Post a Comment