इंदापूर नगर परिषदेने बक्षीसातून मिळालेल्या रुपयांनी खरेदी केले जेटिंग मशीन.....
इंदापूर तालुका प्रतिनिधी.. धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल..
इंदापूर नगर परिषदेला स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेअंतर्गत मिळालेल्या बक्षीस रकमेतून खरेदी केलेल्या जेटिंग मशीनचे आज इंदापूर शहरातील लोकमान्य नगर येथे प्रात्यक्षिक करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष माननीय सो अंकिता ताई शहा मुख्य अधिकारी माननीय श्री रामराजे कापरे इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव माननीय श्री मुकुंद शेठ शहा व नगरपरिषदेचे आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या जेटिंग मशीन द्वारे शहरातील गल्लीबोळातील तुंबलेल्या गटारी व चेंबरची साफ सफाई करण्यात येणार आहेत. तसेच या मशीनद्वारे रोगराईच्या काळामध्ये औषध फवारणी करण्याची सुद्धा सोय आहे त्यामुळे भविष्यात शहरातील साफसफाई व औषध फवारणी करण्याकरिता या मशीनचा अत्यंत उपयोग होणार आहे. मागील पंधरा दिवसापूर्वी सक्शन मशीन वाहन खरेदी करण्यात आले आहे त्याद्वारे शहरातील सार्वजनिक तसेच खाजगी शौचालयाच्या टाकीतील मैला उपसण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. मागील चार पाच वर्षापासून इंदापूर नगरपरिषद स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेअंतर्गत सलग मिळालेल्या मानांकना मूळे बक्षीस रुपी मिळालेल्या रकमेतून ही वाहने खरेदी करण्यात आली असून अजून काही वाहने खरेदी करण्यात येणार आहेत. इंदापूर शहरातील सर्व नागरिक बंधूंनी स्वच्छते बाबत केलेल्या सहकार्यामुळेच आज आपल्या शहराचे व नगर परिषदेचे नाव देशपातळीवर नोंदले गेले आहे. येथून पुढेही सर्व नागरिकांनी स्वच्छते संबंधी जागरूक राहून स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी इंदापूर नगरपरिषदेस सहकार्य करावे व स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा असे आव्हान माननीय नगराध्यक्ष सौ अंकिता ताई शहा व माननीय मुख्य अधिकारी श्री रामराजे कापरे यांनी केले.
Comments
Post a Comment