राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबिराचे आयोजन......
सोलापूर प्रतिनिधी वैभव यादव
भारती विद्यापीठ अभिमत विश्व विद्यापीठ पुणे अभिजीत कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्सेस सोलापूर येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबीरा मध्ये दिनांक 6 मार्च 2022 रोजी प्रा. डॉ. चंद्रकांत चव्हाण सर इतिहास विभाग प्रमुख वालचंद महाविद्यालय सोलापूर यांचे राष्ट्र उभारणीत युवकांचे योगदान या विषयावर मार्गदर्शन केले. सकारात्मक विचारांमुळे माणसाला यश नक्कीच प्राप्त होते.त्या करीता युवकांमध्ये सृजनशिलता, मानवता या मुलभूत तत्वांचे जपणूक करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. या वेळी श्री रामलिंगेश्वर प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयचे संस्थापक चेअरमन प्रा. डॉ. भिमाशंकर बिराजदार यांचे चिरंजीव श्री शिवराज बिराजदार संगणक विगाभ प्रमुख डॉ.ए.बी नदाफ राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.सी. आर सुर्यवंशी व राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीरार्थीउपस्थित होते. शिबीरार्थी कु.हर्षा हरकुट , कु. प्रिया पाटील यांनी सुत्रसंचालन केले, कु. मृणाल हलकुडे यांनी आभार मानले. पाहुणाचा परिचय उजमा नदाफ यांनी केला.
Comments
Post a Comment