इंदापूर महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा
इंदापूर तालुका प्रतिनिधी.. धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल..
   सहदिवाणी न्यायाधीश एस.डी. वडगावकर आणि जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनी केले मार्गदर्शन....
     उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय आयोजित येथील शाहीर अमर शेख सभागृहामध्ये दि.8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला.
   इंदापूर न्यायालयाच्या सहदिवाणी न्यायाधीश एस.डी. वडगावकर आणि जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
  समाजातील समानता, बंधुता, एकता या तत्त्वांना अनुसरून घटनात्मक तरतुदीच्या साह्याने महिलांनी आपल्या हक्क घेण्यासाठी सक्षम होणे काळाची गरज असल्याचे  सहदिवाणी न्यायाधीश एस.डी.वडगावकर यांनी आपले मत मांडले.
   अंकिता पाटील म्हणाल्या की,' महिलांनी आत्मविश्वासाने प्रत्येक क्षेत्रात संधी निर्माण करणे आवश्यक आहे तसेच आजच्या आधुनिक युगामध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, व्यापार, शिक्षण यासारख्या सर्व क्षेत्रांमध्ये महिलांनी आपले स्थान निर्माण केले आहे.
   प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासाची दिशा ही त्या देशातील महिलांच्या सक्षमीकरणावर अवलंबून असल्याचे मत व्यक्त करीत त्यांनी महिला दिनाचे महत्त्व सांगितले.
  यावेळी उपप्राचार्य प्रा. नागनाथ ढवळे, प्राध्यापिका विद्या गायकवाड, मृदुल कांबळे, दमयंती जाधव, स्वाती राऊत, शुभांगी कारंडे, कल्पना अहिवळे, जयश्री सरवदे, सुवर्णा जाधव, मोनाली पाटील, प्रांजली नलवडे, सारिका पाटील, राधिका घुगे उपस्थित होत्या.
   विद्यार्थी विकास मंडळाचे अधिकारी प्रा. डॉ. तानाजी कसबे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
  प्राध्यापिका मनीषा गायकवाड यांनी आभार मानले.

Comments

Popular posts from this blog