संगमेश्वर महाविद्यालयात सायबर सुरक्षा या विषयावर व्याख्यान
सोलापूर प्रतिनिधी.. वैभव यादव.
संगमेश्वर महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना आयोजित सायबर सुरक्षा जनजागृती अभियान अंतर्गत सोशल मीडिया, सायबर क्राईम आणि आजचे तरुण युवक यावर अँड मंजुनाथ कक्कळमेली बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कायदेविषयक तज्ञ अँड मंजुनाथ कक्कळमेली, प्रा.डॉ. मेटकरी , प्रा. ए.व्ही साखरे उपस्थित होते...
ऍड. कक्कळमेली म्हणाले सायबर क्राईम चे वाढते गुन्हे बघता सर्वसामान्य व्यक्ती त्यापासून कसे सुरक्षित राहू शकतात. फेसबुक ,इंस्टाग्राम व ट्विटर ह्या गोष्टी हाताळताना सावधगिरी बाळगली पाहिजे. तसेच आपला मोबाईल अनोळखी व्यक्तीला कधी देऊ नये. त्याद्वारे मोबाईल हॅक होण्याची दाट शक्यता असते, सोशल मीडियावर भुरळ पाडणाऱ्या व फसव्या संदेशाला बळी पडु नये. मेसेज पुढे पाठवीत असताना त्याची शहानिशा कसे करावी, सेक्सटॉरशन कसे करतात, हॅकिंग व क्लोनिंग यामधील हे उदाहरणासहीत फरक विद्यार्थ्यांना व्याख्याना द्वारे समजावून सांगितले. लाॅकडाऊन नंतर प्रथमच मुक्तपणे विद्यार्थ्यांसोबत समोरासमोर संवाद साधता आला. अशी प्रतिक्रिया अँड मंजुनाथ कक्कळमेली यांनी दिले..
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा बगले तर पाहुण्यांचे परिचय बाळासाहेब कांबळे यांनी केलं तसेच या कार्यक्रमाचे आभार करत असताना समन्वयक प्रा. ए.व्ही साखरे यांनी आशा वक्तत्यांची व व्याख्यानांचे आज युवा पिढीला गरजेचे आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आम्ही समाज प्रबोधन करत राहू असे बोलून त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिकेत फताटे,उषा बामणे, दिग्विजय पाटील,ईरण्णा मटपती, लक्ष्मीपुत्र बगले विजय माने , तेजस व्हनमाने यांनी परिश्रम घेतले.या व्याख्यानाला राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते..
Comments
Post a Comment