अवघ्या ४० गुंठ्यात शेतकरी झाला मालामाल .....
इंदापूर तालुका प्रतिनिधी.. धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल...
इंदापूर तालुक्यातील बाबडा गावाच्या परिसरातील सावंत वस्तीवरती शेतात पिकविले कलिंगड्याचे पिक...
शब्बास अवघ्या ४० गुंठ्यात शेतकरी झाला मालामाल....
बावडा सावंतवस्तीच्या शिवारातून पिकविले कलिंगड्याचे पिक आदित्य सावंत या युवकाची यशोगाथा हा मुलगा वैशाली व पोपट सावंत यांचा एकुलता एक मुलगा त्याची पत्नि शेतकरी कुटुंबातील गितांजली ही सतत पाठीमागे हातभार लावणारी वेळोवेळी मदत करणारी आदित्य हा बी काॅम झालेला ,नोकरीच्या मागे न लागता व सुशिक्षित बेकार न रहाता आपण काहीतरी करुन दाखविले पाहिजे या दृष्ठीने जिद्दिने चिकाटी श्रम ध्येयाने चिकाटीने न डगमता एक ध्येय डोळ्यासमोर ठेवुन तो शेती हा व्यावसाय करु लागला .आज अनेकजन डाळिंब,केळी, ऊस या पिकाकडे ओळले आहेत. हवामानाचा आंदाज करुन व वाढते तापमान पाहुन उन्हाळ्यात थंड पिकाला चांगला दर मिळेल व कमी दिवसा या पिकाचे उत्पनन्न मिळेल यासाठी प्रथमच त्याने कलिंगड हे फळ घेण्याचे ठरविले ,शेतीची नांगरट कोळपणी करुन शेणखत घालुन कोळपणी करुन शेतची मशागत केले. शेतात दोन बाय दोनचे वरिंबे तयार करुन त्यावर ब्लेचींग कागद अंथरुन एक फुट अंतरावर जा,ची,ची कलिंगड्याच्या रोपाची ठिंबक सिंचनवरती लागवड केली . याला त्याचे मिञ यांनी योग्यमार्दशन केले तसेच कृषिअधिकारी यांच्या मार्गदर्शना खाली वेळोवेळी औषधाच्या फवारण्या करुन कलिंगड्याचे ४५ दिवसाचे पिक घेतले असुन तो माल १ एकरात २१ टन भरले असुन या पिकाला बाजार भाव ११रु किलो या दराने मिळाले फायदा झाला त्यामुळे बावडा परिसरात त्याचे कौतुक होत आहे, तसेच मिञांकडून अभिनंदन होत आहे.
Comments
Post a Comment